Call Us
+917028251980
Mail Us
support@studycircle.org.in
Address
Nashik, Bharat
मातीचा पीएच - कमी करायचा का?

मातीचा पीएच - कमी करायचा का?

आपल्या भागातील जमिनीचा pH बहुतेक वेळा 8 ते 8.5 च्या आसपास असतो आणि पाण्याचाही pH तसाच असतो. pH जास्त आहे म्हणून जमीन वाईट असे नसतं. मोठी अन्नद्रव्यं N, P, K अशीच उपलब्ध राहतात. फक्त काही मायक्रो न्यूट्रियंटस कमी उपलब्ध होतात. pH कमी करण्यासाठी आम्ल किंवा सल्फर वापरलं तर EC वाढण्याचा धोका असतो आणि जमिनीची नैसर्गिक रचना बिघडू शकते. त्यामुळे pH बदलण्यापेक्षा शाश्वत पद्धतीने मायक्रो न्यूट्रियंटची कमतरता भरून काढणं हे जास्त सुरक्षित आणि परिणामकारक आहे.

Video lesson

No video for this lesson.

मातीचा पीएच - कमी करायचा का?

आपल्या भागात 8.2 ते 8.7 असा pH दिसणं अगदी सामान्य आहे. काही ठिकाणी पाण्याचा pH 8.5 च्या आसपास असतो. हा pH पाहून बरेच शेतकरी घाबरतात आणि वाटतं की जमीन बिघडली, पिकाला पोषण बंद झाले, उत्पादन कमी होणार. पण खरं विज्ञान वेगळंच आहे. जास्त pH असला तरी मुख्य अन्नद्रव्यं— नायट्रोजन, फॉस्फोरस, पोटॅश—ही पिकांस उपलब्धच असतात. थोडी समस्या मायक्रो न्यूट्रियंट्सची होते, पण तीही आपण योग्य पद्धतीने सांभाळू शकतो.

सगळ्यात आधी समजून घ्यायची गोष्ट म्हणजे अशा जमिनीत कैल्शियम कार्बोनेट (CaCO₃), मॅग्नेशियम कार्बोनेट (MgCO₃) आणि पाण्यातील बायकार्बोनेट (HCO₃) ही नैसर्गिकरित्या जास्त असतात. ही खनिजं जमीन "बफर" करून ठेवतात, एक प्रकारे मातीचा कोणत्याही प्रकारच्या बदलांस प्रतिकार करतात. म्हणजे pH खाली आणायचा प्रयत्न केला तर ही क्षार लगेच आम्ल (acid) निष्प्रभ करतात आणि pH परत वाढवतात. म्हणूनच कोणी सतत pH रिड्युसर, आम्ल, सल्फ्युरिक अॅसिड वापरलं तरी pH फार काळ कमी राहील याची खात्री नसते.

आता एक महत्त्वाची गोष्ट—जमिनीत आम्ल टाकलं की pH कमी होईल असं वाटतं, पण त्याच वेळी काही वेगळंच घडतं. आम्ल जमिनीतील CaCO₃, MgCO₃ यांना विरघळवतो. त्यातून Ca², Mg², SO₄², CO₂ असे आयन्स जमिनीच्या द्रावणात वाढतात. द्रावणात क्षार वाढलीत म्हणजे EC (इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी) वाढते. EC जास्त झाला की पिकाव्दारे पाणी शोषण कमी होतं, मुळं ताणाखाली जातात, आणि उत्पादन घटतं. म्हणजे pH कमी करण्याच्या प्रयत्नात EC वाढून पिकाचं नुकसान होण्याची मोठी शक्यता वाढु शकते.

इथे अजून एक महत्त्वाचा वैज्ञानिक मुद्दा विचारात घ्यायला हवा—CEC (कॅटायन एक्स्चेंज कॅपॅसिटी). जेव्हा आपण जमिनीत जास्त प्रमाणात H⁺ (आम्लातून येणारे हायड्रोजन आयन) टाकतो, तेव्हा हे H⁺ आयन जमिनीच्या सूक्ष्म कणांवर बसतात आणि आधीपासून असलेले Ca²⁺, Mg²⁺, K⁺ यांना त्या जागेवरुन बाहेर काढतात.हे Ca आणि Mg पाण्यात विरघळतात, काही प्रमाणात वाहूनही जातात, काही प्रमाणात नवीन क्षार बनवतात. म्हणजे आम्ल टाकून pH कमी करण्याचा प्रयत्न केला तर मुख्य अन्नद्रव्यं पाण्यात वाढतात, नंतर एक तर मातीत खोलवर वाहुन जातात किंवा अनेकदा हि अन्नद्रव्ये जास्त वहमशील नसल्याने नविन क्षार बनवतात आणि परिणामी EC आणखी वाढते. हा परस्पर परिणाम लवकर लक्षात येत नाही.

आता प्रश्न राहतो—pH कमी करायचा नसेल तर काय करायचं? उत्तर खूप सोपं आहे. मुख्य अन्नद्रव्यं (N, P, K) ही pH 8—8.5 मध्येही पिकांना मिळतात. जमीन त्यात अडथळा आणत नाही. फक्त मायक्रो न्यूट्रियंटस—जसे की लोह (Fe), झिंक (Zn), मँगनीज (Mn), बोरॉन (B)—यांची उपलब्धता कमी होते. आणि हे मायक्रो न्यूट्रियंटस पिकांना फार थोड्या प्रमाणात लागतात. आपण ते फेरस सल्फेट, झिंक सल्फेट, फोलिअर स्प्रे, किंवा EDDHA सारख्या चेलेट्स यांच्या मदतीने अगदी सहज देऊ शकतो. यात pH बदलायची गरजच पडत नाही.

 टोमॅटो सारख्या पिकाचं उदाहरण घ्या—NPK याचं प्रमाण जास्त लागणार, आणि हे तिन्ही pH 8 च्या आसपासच्या जमिनीत उपलब्धच असतात. फक्त लोह आणि झिंक कमी पडतं, ते आपण फवारणीतुन किंवा ड्रिपमधून सहज देऊ शकतो. मग pH कमी करण्यासाठी मातीसोबत खेळ करण्याची गरज शक्यतो भासत नाही.

शेवटी, शाश्वत उपायच फायदेशीर ठरतात—सेंद्रिय पदार्थ वाढवणे, आम्लीय प्रभाव देणारी खते (जसे अमोनियम सल्फेट), फेरस सल्फेटने स्थानिक आम्लीय वातावरण तयार करणे, आणि जमिनीला हलका जैविक आधार देणे. या उपायांनी पिकाला हवं ते पोषण मिळतं, जमिन स्वच्छ राहते आणि EC वाढण्याचा धोका राहत नाही.

pH बदलण्याचा प्रयत्न हा तात्पुरता आणि धोकादायक असतो, पण योग्य व्यवस्थापनाने जास्त pH असलेली जमीनही अनेक वर्षे उत्कृष्ट उत्पादन देऊ शकते.



Supporting files

No files available for this lesson.