मुळांचा श्वास
मुळांचा श्वास हा पिकाचा जीव आहे. पाणी, खत आणि सगळा खर्च तेव्हाच परिणाम देतो, जेव्हा मुळांना श्वसनासाठी पुरेशी हवा मिळते. म्हणून मातीतील हवा खेळती ठेवणे, pores जिवंत ठेवणे आणि योग्य पाणी व्यवस्थापन करणे हे कोणत्याही पिकाच्या उत्पादनाचं खरं गुपित आहे.
Video lesson
No video for this lesson.
पिकाच्या वाढीमध्ये मुळांची श्वसनक्रिया ही अत्यंत महत्त्वाची पण बहुतेक वेळा नजरेआड होणारी प्रक्रिया आहे. पानं सूर्यप्रकाश घेऊन अन्न तयार करतात, पण मुळांचं काम अगदी उलट असतं—मुळे ऑक्सिजन (O₂) घेतात आणि कार्बन डायऑक्साइड (CO₂) सोडतात. मातीच्या आत ही न दिसणारी “श्वसनक्रिया” घडत असते आणि हिच्यावर पिकाच्या संपूर्ण पोषण प्रक्रियेचा पाया टिकून असतो. मुळांना श्वास घेण्यासाठी मातीमध्ये हवा असणं अत्यावश्यक आहे.
मातीतील कणांच्या मधल्या जागा—ज्यांना पोअर्स म्हणतो—हे पोअर्स काही भाग पाण्याने आणि काही भाग हवेनं भरलेले असतात. हे वायू-आधारित पोअर्स मुळांसाठी “फुफ्फुसं” म्हणून काम करतात. जर जमिनीत सतत पाणी साचलं किंवा भारी जमिनीत पाणी जिरत नसेल तर हे पोअर्स पूर्णपणे पाण्याने भरतात आणि हवा बाहेर ढकलली जाते. अशा वेळी मुळांना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यांच्या श्वसनक्रियेला अडथळा येतो, ज्यामुळे मुळं थकतात, कुजतात आणि शेवटी पिकाची वाढ खुंटते.
मुळं जेव्हा श्वास घेतात तेव्हा ते CO₂ मातीमध्ये सोडतात. हा CO₂ जमिनीतल्या पाण्याशी एकत्र येऊन नैसर्गिक कार्बोनिक आम्ल (H₂CO₃) तयार करतो. कार्बोनिक एसीड हे सौम्य आम्ल जमीनीतल्या काही खतांना हळूहळू विरघळवून फॉस्फरस किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवण्यास मदत करतं. म्हणजे मातीतील हवा, पाणी आणि मुळांची श्वसनक्रिया या तीनही गोष्टी एकत्रितपणे पिकाची पोषणप्रक्रिया चालवतात. पण जर मातीमध्ये हवा नसेल—पोअर्स ब्लॉक झालेले असतील, माती दाबलेली, घट्टा झालेली असेल, पाणी जास्त असेल किंवा EC वाढलेला असेल—तर ही संपूर्ण प्रक्रिया थांबते. EC जास्त असला की पिकाला पाणी शोषायला त्रास होतो आणि त्याचवेळी मुळांभोवतीच्या द्रावणातील क्षारांची ताव्रता वाढते. परिणामी मुळे अधिक ऑक्सिजन घेण्याचा प्रयत्न करतात, पण pores पाण्याने किंवा क्षारांनी भरलेले असल्याने श्वसनक्रियेलाच अडथळा येतो. अशा वेळी पिकात पिवळसरपणा, वाढ कमी होणे, पानं सुकणे आणि नंतर अचानक वाळवणारा ताण दिसतो, आणि कारण “हवा न मिळणं” असतं.
जमिनीचा प्रकारही श्वसनक्रियेला मोठ्या प्रमाणात प्रभावित करतो. काळ्या चिकणमाती सारख्या जमिनीत पाणी खूप धरून ठेवण्याची क्षमता असते आणि pores पटकन पाण्याने भरतात, त्यामुळे अशा जमिनीत मुळांना श्वसनाचा जास्त त्रास होऊ शकतो. उलट, हलक्या किंवा लाल मातीमध्ये pores मोठे असल्याने हवा जास्त राहते आणि मुळांची श्वसनक्रिया नीट चालते. माती दाबली जाणं, घट्ट होणे (compaction) हे आणखी एक मोठं कारण आहे—वारंवार ट्रॅक्टरचा भार, ओल्या जमिनीत मशागत, आणि पाण्याचा अति वापर यामुळे मातीचे pores बंद होतात आणि हवेचा पुरवठा कमी होतो.
मुळांची श्वसनक्रिया टिकवण्यासाठी काही साधे पण परिणामकारक उपाय आहेत. जमिनीत पाणी साठू न देणे आणि चांगली निचरा क्षमता ठेवणे हे पहिले पाऊल आहे. ओल्या जमिनीत खोल मशागत टाळणे, पिकांच्या ओळींमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढवणे, मल्चिंग वापरणे आणि गरज भासल्यास उपसा (subsoiling) करून कडक थर मोडणे—हे सर्व उपाय pores मोकळे ठेवून हवेची देवाणघेवाण सुधारतात. EC नियंत्रणात ठेवणेही तितकंच महत्त्वाचं आहे, कारण जास्त EC हे पाण्यापेक्षा मोठं श्वसन-अडथळा कारण बनू शकतं. या सर्व उपायांनी मुळांना पुरेसा ऑक्सिजन मिळतो, CO₂ ची नैसर्गिक प्रक्रिया चालू राहते आणि पिकाच्या वाढीवर त्याचा त्वरित सकारात्मक परिणाम दिसतो.
मुळांचा श्वास हा पिकाचा जीव आहे. पाणी, खत आणि सगळा खर्च तेव्हाच परिणाम देतो, जेव्हा मुळांना श्वसनासाठी पुरेशी हवा मिळते. म्हणून मातीतील हवा खेळती ठेवणे, pores जिवंत ठेवणे आणि योग्य पाणी व्यवस्थापन करणे हे कोणत्याही पिकाच्या उत्पादनाचं खरं गुपित आहे.
No files available for this lesson.